शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे उभारण्यात आलेल्या कोविड-19 केंद्राची विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर यांनी केली पाहणी


पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी येथे उभारण्यात आलेल्या कोविड-19 च्या केंद्राला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज भेट देवून पाहणी केली. पुढील काळात कोरोनाचे रुग्ण वाढल्यास या केंद्राचा कशाप्रकारे उपयोग होऊ शकतो या कामाची माहिती जाणून घेत त्यांनी कोविड केंद्रावर लागणाऱ्या खाटा, सी.सी.टी.व्ही. व आवश्यक त्या वैद्यकीय सोयी-सुविधांबाबत सूचनाही केल्या. तसेच तेथील विविध ठिकाणांचीही माहिती घेतली.


यावेळी कोथरुड बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे अतिरिक्त आयुक्त शंतनु गोयल, सहायक आयुक्त संदीप कदम, पुणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.अजय बेंद्रे, आरोग्य विभागाचे डॉ.शिवाजी विधाटे व महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image