आकाशवाणी वार्ताहराच्या नियुक्तीसाठी अर्ज मागवले


मुंबई (वृत्तसंस्था) : आकाशवाणी, मुंबई कार्यालयाच्या प्रमुख कार्यालयाच्या वतीनं अमरावती आणि कोल्हापूर या जिल्ह्यात, प्रत्येकी एका जागेसाठी कंत्राटी तत्वावर अर्ध वेळ वार्ताहराच्या नियुक्तीसाठी अर्ज मागवले आहेत.

पत्रकारिता किंवा जन-संज्ञापनातील पदव्युत्तर पदविका किंवा पदवी अथवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि किमान दोन वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असलेले यासाठी अर्ज करू शकतात.

हे अर्ज येत्या ११ जून पर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग, नवीन प्रसारण भवन, एच.टी. पारेख मार्ग, आकाशवाणी, मुंबई-४०० ०२० या पत्त्यावर तसेच hiring.rnumumbai@gmail.com या ई-मेल वर पाठवायचे आहेत.

या नियुक्तीसाठी अर्ज करतानाच्या अटी आणि नियमांचा तपशीलासाठी आमच्या www.newsonair.com/marathi या संकेतस्थळाला भेट द्या.


Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image