सीमाभागात कुठल्याही प्रकारचा हिंसाचार नाही भारतीय लष्करानं स्पष्ट केलं


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या सीमाभागात कुठल्याही प्रकारचा हिंसाचार होत नसल्याचं भारतीय लष्करानं स्पष्ट केलं आहे. उत्तर सीमेवर सध्या निर्माण झालेल्या तणावाच्या स्थितीवर समाजमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या चित्रफिती पूर्णपणे बनावट असून, राष्ट्रीय सुरक्षेला बाधा पोहोचवणाऱ्या या चित्रफितींबाबत लष्करानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर निर्माण झालेला तणाव संवादाच्या माध्यमातून कमी करण्याचा प्रयत्न दोन्ही देश करत असून, माध्यमांनी या प्रक्रियेत बाधा येईल अशी कुठलीही गोष्ट प्रसारित करू नये, असं आवाहन भारतीय  लष्करानं केलं आहे. 


Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image