ज्येष्ठ संपादक वामनराव तेलंग यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली


मुंबई : ज्येष्ठ संपादक वामनराव तेलंग यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या साहित्यिक, पत्रकारितेच्या चळवळीचा मार्गदर्शक, प्रेरणास्रोत  हरपला आहे. तेलंग साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली पत्रकार, साहित्यिकांची पिढी त्यांच्या कर्तृत्वाचा वारसा समर्थपणे पुढं नेईल, असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वामनराव तेलंग यांना श्रद्धांजली वाहिली.


उपमुख्यमंत्री अजित पवार शोकसंदेशात म्हणतात की, विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यवाह या नात्यानं तेलंग साहेबांनी महाराष्ट्रातील  साहित्य चळवळ पुढं नेण्याचं काम केलं. नवोदित लेखकांना मार्गदर्शन करुन साहित्यिक ओळख मिळवून दिली. परखड लेखनाच्या माध्यमातून पत्रकारितेची प्रतिष्ठा वाढवली. त्यांच्या निधनानं विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्राच्या साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक चळवळीची हानी  झाली आहे.


Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image