कोकणातल्या चक्रीवादळग्रस्तांना सरकारची अद्याप एक रुपयाचीही मदत पोहोचली नसल्याचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांचा आरोप


मुंबई : निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणातल्या नुकसानग्रस्तांना मदत देण्याबाबत चर्चा करण्यासाठी, विधानसभेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडनवीस यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

नुकसानग्रस्तांच्या वतीनं, त्यांनी या संदर्भातल्या मागण्यांचं निवेदन, मुख्यमंत्र्यांना यावेळी सादर केलं. फडनवीस यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.


कोकणातल्या चक्रीवादळग्रस्तांना सरकारची अद्याप एक रुपयाचीही मदत पोहोचली नसून या नुकसान ग्रस्तांची अवस्था सध्या अत्यंत दयनीय आहे, त्यांना मदत करण्याबाबत सरकारचं अस्तित्व कुठेही दिसत नाही, हे आपण मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनाला आणून दिल्याचं, फडनवीस यांनी या भेटीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. 


Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image