कोरोनाविरुद्धच्या लढाईतील ‘पोलीस योद्धे’ आपत्ती सेवा पदकाने गौरविले जाणार – गृहमंत्री अनिल देशमुख


मुंबई : कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यात सर्वत्र अगदी ग्रामपातळीपर्यंत पोलीस कर्मचारी अधिकारी यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आपल्या जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य निभावले आहे त्या सर्व पोलिसांचा यथोचित सन्मान सत्कार आपत्ती सेवा पदक देऊन करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.


महाराष्ट्रातील पोलीस दल गेल्या तीन महिन्यापासून राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच जनमानसात सुरक्षा व  सामाजिक बांधिलकी रहावी याकरिता अहोरात्र कार्यरत आहेत. लोकांच्या सुरक्षा पासून सुरक्षिततेपर्यंतची सर्व कामे पोलीस करीत आहेत. लॉकडाऊनमध्ये लोकांना अगदी मास्क लावा असे समजावून सांगण्यापासून ते सामाजिक अंतर राखण्यास प्रवृत्त करण्यापर्यंतची सर्व कामे पोलिसांना करावी लागली. परप्रांतीय कामगारांना पाठवण्यात मोठ्या प्रमाणात पोलिसांना कार्य करावे लागले.       


हे सर्व करत असताना पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांना कोरोना संसर्ग झाला. त्यासही न डगमगता आपल्या पोलीस बांधवांनी आपले कर्तव्य सुरूच ठेवले. दुर्दैवाने  आपल्या 42 पोलिस बांधवांना यात वीरगती प्राप्त झाली. राज्यातील पोलीस बांधवांना सन्मानित करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी, त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करण्यासाठी गृह विभागातर्फे आपत्ती सेवा पदक देऊन पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान व गौरव करण्यात येणार असल्याचे श्री. देशमुख यांनी म्हटले आहे.


Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image