14 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सर्व सदस्यांची कोरोना चाचणी अनिवार्य़


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष वैकय्या नायडू यांनी आपली कोरोना चाचणी करुन घेतली असून येत्या संसदेच्या 14 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनासाठी सर्व सदस्यांची कोरोना चाचणी अनिवार्य़ आहे.

राज्यसभा सदस्यांसाठी जारी करण्यात आलेल्या एका मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व सदस्यांनी अधिवेशन सुरू होण्याच्या 72 तास आधीपर्यंत आपली कोरोना चाचणी करुन घेण्यास सांगण्यात आलं आहे. संसद भवनातल्या चाचणी केंद्रात वा कोणत्याही खाजगी वा सरकारी रुग्णालयात ही चाचणी करण्याचेही या सूचनेत म्हटले आहे. सदस्यांच्या सुविधेसाठी संसद भवन परिसरात तीन चाचणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. अधिवेशन काळात संसद भवन परिसरात येणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांची आणि वाहन चालकांचीही चाचणी करण्यात येणार आहे.