कोविड-19 चे 87 हजार 472 रुग्ण बरे झाले, रुग्ण बरे होण्याचा दर 78 टक्क्यांवर



नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज सर्वाधिक 87 हजार 472 रुग्ण कोविड-19 संसर्गातून मुक्त झाले. त्यामुळे कोविड-19 संसर्गातून मुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 41 लाख 12 हजार झाली आहे. रुग्ण बरे होण्याच्या दरातही सुधारणा झाली असून, तो आता 78 पूर्णांक 86 टक्के झाला आहे.


सध्या देशभरात 10 लाख 17 हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशाचा मृत्यूदर जगात सर्वात कमी, एक पूर्णांक 62 टक्के आहे. गेल्या चोवीस तासात 1 हजार 174 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे देशात एकूण 84 हजार 372 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 



भारतीय वैद्यकीय संशोध परिषदेनं दिलेल्या माहितीनुसार गेल्या चोवीस तासात 10 लाख 6 हजार चाचण्या करण्यात आल्या. देशातल्या एकूण चाचण्यांची संख्या 6 कोटी 15 लाख झाली आहे. आजमितीस देशात एक हजार 60 सरकारी तसंच 704 खासगी प्रयोगशाळांसह 1 हजार 764 प्रयोगशाळांमधे कोरोनाच्या चाचण्या करण्यात येत आहे.