होमिओपॅथी केंद्रीय परिषद 2020 आणि भारतीय केंद्रीय औषध परिषद दुरुस्ती विधेयकं राज्यसभेत सादर


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : होमिओपॅथी केंद्रीय परिषद 2020 आणि भारतीय केंद्रीय औषध परिषद अशी दोन दुरुस्ती विधेयकं एकत्रितपणे विचारात घेण्यासाठी आणि मंजूर करण्यासाठी राज्यसभेत पटलावर ठेवण्यात आली आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आज या विधेयकांच महत्त्व स्पष्ट करत ती सादर केली आहेत.

या विधेयकात होमिओपॅथीचं शिक्षण आणि अभ्यासाचे नियमन करणाऱ्या होमियोपॅथीची सेंट्रल कौन्सिलची स्थापन करण्यात आली आहे. या वर्षी एप्रिलमध्ये जाहीर करण्यात आलेल्या विधेयकाची हे विधेयक जागा घेणार आहे. भारतीय औषध केंद्रीय परिषद या दुरुस्ती विधेयकात आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार या भारतीय औषध प्रणालीच्या शिक्षण आणि अभ्यासाचे नियमन करणार्या केंद्रीय परिषदेची स्थापना करण्याची तरतूद आहे.

तर ही विधेयक अध्यादेश मार्गाने न आणता वैधानिक ठरवानी मांडावेत अशी मागणी कॉंग्रेस आणि डाव्या पक्षाच्या नेत्यांनी केली आहे.