देशातल्या विविध बंदरांमधे अडकलेल्या कांदा निर्यातीला पियुष गोयल यांची परवानगी


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या विविध बंदरांमधे तसंच सीमेवर अडकलेल्या ट्रक कंटेनरमधल्या कांदा निर्यातीला वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी परवानगी दिली आहे. केंद्रसरकारनं कांद्यावर निर्यातबंदी घातल्यामुळे परदेशात जाणारा लाखो टन कांदा सीमेवर तसंच बंदरांमधे अडकून पडला होता. अजून काही काळ तसाच राहिला असता, तर तो सडून शेतक-यांचं आणि व्यापा-यांचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालं असतं.

खासदार डॉ भारती पवार यांनी तातडीनं संसदेत हा प्रश्न उपस्थित करुन कांद्यावरची निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी केली. वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांना वस्तूस्थिती सांगून सीमेवर अडकेल्या मालाला निर्यातीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी केली. गोयल यांनी ती मान्य केली आहे.