केशवानंद भारती यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक ; समाजसेवेसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे केले स्मरण


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केशवानंद भारती यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधान म्हणाले, “पूज्य केशवानंद भारती जी यांनी समाजसेवेसाठी आणि दलित जनतेचे  सशक्तीकरण करण्याप्रति दिलेल्या  योगदानाबद्दल आपण  नेहमीच त्यांचे स्मरण करू. त्यांनी भारताची समृद्ध संस्कृती आणि आपल्या महान राज्यघटनेवर मनापासून प्रेम केले. ते अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहतील. ओम शांती.”