‘स्वच्छ रेल स्वच्छ भारत’ अभियानाअंतर्गत स्वच्छता पंधरवडा सुरु


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वेच्या वतीनं ‘स्वच्छ रेल स्वच्छ भारत’ अभियानाअंतर्गत आजपासून ३० सप्टेंबरपर्यंत स्वच्छता पंधरवाड्याचं आयोजन करण्यात आलं आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर मंडळ आणि मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाच्या वतीनं या पंधरवाड्यात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

दक्षिण पूर्व मध्य रेलवेच्या वतीनं आज सकाळी स्वच्छ जागरूकता रैली काढण्यात आली. तर मध्य रेल्वेनंही विभागीय कार्यालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्वच्छता शपथ दिली.