देशात काल दिवसभरात ८९ हजार ७०६ नवे कोरोनाबाधित तर, ७४ हजार ८९४ रुग्ण कोरोनामुक्त


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज सकाळी ८ वाजता संपलेल्या चोवीस तासांत ७४ हजार ८९४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या देशभरातल्या एकूण रुग्णांची संख्या ३३ लाख ३२ हजार ८५० झाली आहे. याबरोबरच देशातला कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर वाढून ७७ पूर्णांक ७७ शतांश टक्के झाला आहे.

याच काळात देशभरात ८९ हजार ७०६ कोरोनाबाधित नव्या रुग्णांचीही नोंद झाली. सध्या देशभरातल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४३ लाख ७० हजार १२९ झाली आहे.

देशभरात काल १ हजार ११५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानं, मृतांची एकूण संख्या ७३ हजार ८९० झाली आहे. सध्या देशभरात ८ लाख ९७ हजार ३९४ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.