मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फार्महाऊसबाबत संशयितपणे चौकशी करणाऱ्या तिघांना अटक


मुंबई (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यात भिलवले इथं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फार्महाऊसबाबत संशयितपणे चौकशी करणाऱ्या तिघांना खालापूर पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांची रायगड पोलीस सध्या कसून चौकशी करीत आहेत.

या तिघांनी ठाकरे फार्महाऊसच्या परिसरात घुसून सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचं वृत्त आहे. या तीनही संशयितांना ताब्यात घेत, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती खालापूर पोलिसांनी दिली.