क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी क्रीडा धोरणात आवश्यक सुधारणा करण्याचा राज्य सरकारचा निर्णय


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्याच्या क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सध्याच्या क्रीडा धोरणात आवश्यक सुधारणा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली.

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पदकविजेत्या राज्यातल्या गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट संधी मिळण्याचा मार्ग अधिक सोपा व्हावा, शासकीय सेवेत आल्यानंतर खेळाडूंना खेळावर लक्ष केंद्रीत करता यावं, यासारख्या अनेक बाबी क्रीडा धोरणात समाविष्ट करण्यात येणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.