राफेल लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीचा भारतीय हवाई दलात आज समारंभपूर्वक समावेश



नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राफेल लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीचा आज अंबाला इथल्या वायुसेनेच्या तळावर झालेल्या विशेष समारंभात भारतीय हवाई दलात समावेश करण्यात आला. यावेळी सर्वधर्मीय प्रार्थना करण्यात आली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि फ्रान्सचे सैन्यदल मंत्री फ्लोरेन्स पार्ली या समारंभाला उपस्थित होते. 



  यावेळी झालेल्या हवाई प्रात्यक्षिकांमध्ये राफेल, सुखोई-३० आणि जगुआर विमानांसह भारतीय बनावटीची तेजस विमानं आणि सारंग हेलीकॉप्टचा देखील समावेश होता. संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत आणि वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल आर के एस भदौरिया यावेळी उपस्थित होते.