गोरेगावच्या नेस्को सेंटर परिसरात २२४ खाटांचे कोविड रुग्णालय सुरु


मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत गोरेगावच्या नेस्को सेंटर परिसरात महानगरपालिकेनं उभारलेल्या २२४ खाटांच्या सुसज्ज कोविड रुग्णालयाचं,  उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी काल उद्घाटन केलं. या कोविड रुग्णालयात, आयसीयु, एचडीयु, डायलिसिस, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, ऑक्सिजन युक्त खाटा, विविध प्रकारचे व्हँटिलेटर, प्रत्येक खाटेसोबत मल्टी पॅरा मॉनिटर अशा सुविधा देण्यात आल्या आहेत.

सर्व खाटा सेंट्रल सर्व्हिलन्स सिस्टमला जोडल्या आहेत. सुपर स्पेशालिटी रुग्णालया प्रमाणे या ठिकाणी सर्व सुविधा देण्यात आल्या असून यामुळे रुग्णांना दिलासा मिळेल, तसच राज्य शासन या केंद्राला सर्व सहकार्य करेल, अशी माहिती देसाई यांनी दिली.