राज्य सरकारनं केलेल्या विनंतीनुसार पदवी परीक्षा तसंच इतर स्पर्धात्मक परीक्षांच्या विद्यार्थ्यांना रेल्वे प्रवासाची रेल्वे मंडळानं दिली अनुमती


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं केलेल्या विनंतीनुसार पदवी तसच इतर स्पर्धात्मक परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, रेल्वे मंडळानं रेल्वे प्रवासाची अनुमती दिली आहे. स्वतःच्या ओळखपत्रासह परीक्षेसाठीचं हॉल तिकीट म्हणजेच प्रवेश पत्र, फक्त परीक्षेच्या दिवशीच प्रवासासाठी ग्राह्य धरलं जाईल, असं मंडळानं स्पष्ट केलं आहे.


या निर्णयामुळे या विद्यार्थ्यांना आता, अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांसह, उपनगरीय रेल्वे गाडीतून परीक्षेच्या दिवशी प्रवास करणं शक्य होणार आहे. तशा सूचना रेल्वे स्थानकांवरचे अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत असंही रेल्वे मंडळानं सांगितलं आहे.