गडचिरोली जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांना तातडीनं ५ हजार रुपयांची मदत देण्याचे निर्देश


मुंबई (वृत्तसंस्था) : गडचिरोली  जिल्ह्यातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना प्रशासनानं तातडीनं  ५ हजार रुपयांची मदत करावी, असे निर्देश देत आपत्तीआणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शासन प्रती हेक्टर १८ हजार रुपयांची मदत देणार असल्याचं  सांगितलं. ते काल पूर परिस्थितीसंदर्भातल्या आढावा बैठकीत बोलत होते. गडचिरोली जिल्ह्यात  सुमारे १७ हजार ३३ हेक्टरहून अधिक शेतीचं पुरामुळे नुकसान झाले आहे. पुरामुळे ४ हजार १७४ लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. 


बैठकीनंतर विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोली तालुक्यातल्या वसा, आरमोरी तालुक्यातल्या चुरमुरा, डोंगरसावंगी, कोंढाळा, देसाईगंज तालुक्यातक्या आमगाव, सावंगी गावाला भेट दिली. चुरमुरा या गावात  वडेट्टीवार यांच्या हस्ते पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून ४ जणांना निधीचं वाटप करण्यात आलं.