वैद्यकीय तपासणीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना वैद्यकीय तपासणीसाठी दिल्लीच्या भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या अर्थात एम्सच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. संसदेच्या अधिवेशनाचा प्रारंभ होण्यापूर्वी संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून घेण्याचा सल्ला त्यांना यापूर्वी कोविड वरील उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडताना देण्यात आला होता.