अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद जपानच्या नाओमी ओसाकानं पटकावलं


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्युयॉर्क इथं सुरु असलेल्या अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद, जपानच्या नाओमी ओसाकानं पटकावलं आहे.

भारतीय प्रमाणवेळेनुसार आज पहाटे संपलेल्या अंतिम फेरीच्या लढतीत, नाओमी ओसाकानं बेलारुसच्या व्हिक्टोरिया अझारेन्काचं कडवं आव्हान, १-६, ६-३, ६-३ असं दोन तासांच्या झुंजीत परतवून लावत अमेरिकी खुल्या टेनीस विजेतेपदावर २०१८ नंतर, दुसऱ्यांदा  आपलं नाव कोरलं.

पुरुष एकेरीची अंतिम लढत, जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव्ह आणि ऑस्ट्रियाचा डॉमिनिक थिम यांच्यात, भारतीय प्रमाण वेळेनुसार आज रात्री उशिरा ते उद्या पहाटे यावेळेत होणार आहे.