पिंपरी : प्रशासकीय कारणास्तव व जनतेच्या सोयीसाठी 19 ऑक्टोबर 2020 पासून उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड कार्यालयामार्फत विविध संवर्गाच्या नवीन व कालबाह्य झालेल्या अनुज्ञप्तीचे नुतनीकरण व त्या करिताच्या पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणी आयडीटीआर नाशिक फाटा भोसरी येथे घेण्यात येतील व सदर विविध संवर्गाच्या चाचण्याच्या पुर्ननियोजन करण्यात आले आहे.
यानुसार केवळ चारचाकी (खाजगी व परिवहन) या संवर्गाकरीता – आयडीटीआर नाशिक फाटा,भोसरी, चारचाकी (खाजगी व परिवहन) व जडवाहन या संयुक्त संवर्गासाठी - आयडीटीआर नाशिक फाटा,भोसरी, केवळ दुचाकी संवर्गाकरिता- कार्यालयाच्या इमारतीच्या बाजूच्या मोकळया मैदानात (पुर्वीच्या ठिकाणी), दुचाकी व चारचाकी (खाजगी व परिवहन) या संयुक्त संवर्गासाठी - ट्रॉफिक पार्क, तिनचाकी व चारचाकी (खाजगी व परिवहन) या संयुक्त संवर्गासाठी - ट्रॉफिक पार्क, दोन संवर्गाव्यतिरिक्त इतर सर्व संवर्गाकरीता - ट्रॉफिक पार्क अशी ठिकाणे निश्चित करण्यात आल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड, पुणे यांनी कळविले आहे.