केंद्रात नरेंद्र मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भाजपा सेवा दिवस संपूर्ण देशभर साजरा
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला आज एकूण सात वर्ष आणि दुसऱ्या खेपेची दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल, भाजपा आजचा हा दिवस संपूर्ण देशभर सेवा दिवस म्हणून साजरा करत आहे. यानिमित्त आयोजित केलेल्या, सेवा ही संघटन, या कार्यक्रमाला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आज संबोधित केलं. दिल्लीमधल्या कोविडग्रस्तांसाठी विविध प्रकारची साधनसामुग्रीही त्यांनी यावेळी वितरित केली. पक्षाचे कोट्यवधी कार्यकर्ते देशभर खेड्यापाड्यांमध्ये आणि झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन गरजूंची सेवा करत असून त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत असं ते यावेळी म्हणाले. कार्यकर्ते, अन्न-औषध-शिधा आणि इतर मदत सामुग्रीचं वाटप करत असून कोरोना चाचण्या, ऑक्सिजनचा पुरवठा अशी कामं सुद्धा करत आहेत, असं त्यांनी सांगितलं. सेवाही संघटन, या कार्यक्रमाच्या निमित्तानं, कोविडच्या सर्व नियमांचं पालन करत, किमान दोन गावांना भेटी देऊन सेवा करण्याचं, पक्षाचे खासदार, आमदार, मंत्री त्यांनी ठरवलं आहे अशी माहितीही त्यांनी दिली. भाजपा प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन काम करत असताना विरोधी पक्ष मात्र केवळ दुरुस्थ प्रणालीच्या माध्यमातून टीका करण्याव्यतिरिक्त इतर काहीही करत नसल्याचा दावा नड्डा यांनी यावेळी केला. दरम्यान, उस्मानाबाद इथं आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सत्कार केला.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.