नंदिग्राम विशेष एक्सप्रेस आणि नागपुर-कोल्हापुर विशेष एक्सप्रेस पुन्हा सुरु होणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : आदिलाबाद-मुंबई सी.एस.टी.एम. नंदिग्राम विशेष एक्सप्रेस आणि नागपुर-कोल्हापुर विशेष एक्सप्रेस पुन्हा सुरु होणार आहेत. कमी प्रवासी संख्येमुळे या गाड्या तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या होत्या. मुंबई सी.एस.टी.एम.ते आदिलाबाद नंदिग्राम विशेष एक्सप्रेस येत्या गुरुवारपासून धावणार आहे. कोल्हापुर ते नागपुर विशेष एक्सप्रेस येत्या २ जुलैपासून कोल्हापुर ते नागपुर अशी धावणार आहे. या गाड्या पूर्णतः आरक्षित असतील.गाडी मध्ये प्रवास करतांना केद्र आणि राज्य शासनाने दिलेले कोविड प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करणे प्रवाशांना बंधनकारक आहे.अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image