झांबियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष केनेथ कौंडा यांचं निधन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आफ्रिकेतील गांधी म्हणून ओळखले जाणारे झांबियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष केनेथ कौंडा यांचं आज सकाळी 6 वाजता न्युमोनियाच्या विकारानं निधन झालं. ते 97 वर्षांचे होते.

कौंडा यांनी झांबियातल्या लष्करी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. 1950 ते 1964 असा दीर्घकाळ झांबियानं कौंडा यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटीश राजवटीशी लढा दिला. 1964 साली स्वातंत्र्य मिळाल्यापासून सलग 27 वर्ष त्यांनी झांबियाचं नेतृत्व केलं.

1960 साली ब्रिटीशांविरीद्ध पुकारलेल्या अहिंसक आंदोलनामुळे ते आफ्रिकेतले गांधी म्हणून ओळखले जाऊ लागले होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौंडा यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे.