कोरोना प्रतिबांधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला ३ कोटी लस मात्रांचा टप्पा

 

मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत ३ कोटींहून अधिक डोस देणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे. शुक्रवारी सायंकाळी सातपर्यंत सुमारे ४ लाख ८० हजार नागरिकांना लस देण्यात आली. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास ३ कोटी डोसेसचा टप्पा ओलांडून महाराष्ट्र पुन्हा एकदा देशात अग्रेसर राहिले आहे.

लसीकरणात महाराष्ट्र पहिल्यापासून अग्रस्थानी आहे. शुक्रवारी झालेल्या लसीकरणामुळे सायंकाळी सात पर्यंत ३ कोटी २ लाख ७१ हजार ६०६ लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. एकाच दिवसात ४ लाख ८० हजार ९५४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. सायंकाळी सातपर्यंतची ही आकडेवारी असून त्यात वाढ होण्याची शक्यता असल्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image