लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा विरोधी महाविकास आघाडी सरकारची भूमिका
• महेश आनंदा लोंढे
पिंपरी: समतेचा आणि सामाजिक परिवर्तनाचा पुरस्कार करणारे लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे सर्वार्थाने लोकराजे होते. शिक्षणाद्वारे जातीभेद निर्मुलन, बहुजन समाजासाच्या उन्नतीसाठी त्यांना नोकर्यांमध्ये आरक्षण, स्त्रियांच्या प्रगतीसाठी स्त्री शिक्षणास प्रोत्साहन अशा विधायक कार्याद्वारे सामाजिक न्यायाचा नवा अध्याय लिहिणाऱ्या लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना जयंती निमित्त रिपब्लिकन सेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रमोद क्षिरसागर म्हणाले की "आरक्षणाचे जनक लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांनी समाजातील शेवटच्या घटकास मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची भूमिका घेतली त्यांचा भूमिकेच्या विरोधात सद्ध्या महाविकास आघाडी सरकार ओबीसी आरक्षण विरोधी किंवा पदोन्नती आरक्षण विरोधी जी भूमिका घेत आहे ती पूर्णपणे संविधान विरोधी आहे. आघाडी सरकारचा पुरोगामीत्त्वाचा बुरखा आता पूर्णपणे फाटला आहे. त्याअनुषंगाने राज्य सरकारच्या जातिवादी भूमिके विरोधात आज पुणे शहरात आरक्षण हक्क कृती समिती च्या आयोजनात आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी मा. आनंदराज आंबेकर यांनी सदर आक्रोश मोर्चास पाठींबा जाहीर केला असल्याने महाराष्ट्रात प्रदेश अध्यक्ष सागर डबरासे यांच्या मार्गदर्शनात पुणे जिल्हा रिपब्लिकन सेना पूर्ण ताकदीने मोर्चात सहभागी होणार आहे".
यावेळी पुणे जिल्हाचे अध्यक्ष दीपक जगताप, मुकुंद रणदिवे, युवक अध्यक्ष प्रमोद क्षिरसागर, भैय्यासाहेब ठोकळ, बुद्धभूषण अहिरे, समाधान कांबळे, सूर्यकांत धावारे,आप्पा कांबळे, कूलभूषण कांबळे, संदीप माने, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.