संभाजी ब्रिगेडच्या वतीने साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतीदिन साजरा
• महेश आनंदा लोंढे
पिंपरी : साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतीदिन संभाजी ब्रिगेडच्या वतीने थेरगाव येथील कार्यालयात साजरा करण्यात आला यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा संघटक संतोष बनगर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल विचार मांडताना, पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे म्हणाले की, पृथ्वी हि शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून, कष्टकऱ्यांच्या व श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे. असं ठणकावत मनामनात क्रांतीची ठिणगी पेटवणारे थोर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांनी तेरा लोकनाट्य, तीन नाटके, चौदा कथासंग्रह, पस्तीस कादंबऱ्यां, एक शाहिरी ग्रंथ, पंधरा पोवाडे, एक प्रवास वर्णन, सात चित्रपट कथा, माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन असे, विविध साहित्य लिहिणारे लेखक अण्णाभाऊ साठे यांनी रशियाच्या चौकाचौकात छत्रपती शिवरायांची किर्ती पोवाड्यातुन पोहोचविणारे कष्टकरी श्रमवादी गरीब भटक्यांना आपल्या साहित्यात स्थान देऊन मराठी साहित्यात अजरामर झालेले.
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ह्या लढ्यात अतुलनीय योगदान देणारे थोर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे हे आपल्या देशाला लाभलेल एक अनमोल रत्न आहे, असे विचार काळे यांनी मांडले.
यावेळी छावा मराठा युवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर पाटील सतिश नारखडे तानाजी टोणगर आशीष पाटील अमोल तोडकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.