राज्यात आतापर्यंत ६२ लाख ९९ हजार ७६० रुग्ण कोरोनामुक्त
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल चार हजार ५२४ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६२ लाख ९९ हजार ७६० रुग्ण, कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातला कोरोनामुक्तीचा दर ९७ पूर्णांक ५ शतांश टक्के झाला आहे. काल राज्यात ४ हजार १५४ नवे रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६४ लाख ९१ हजार १७९ झाली आहे. राज्यात सध्या ४९ हजार ८१२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल ४४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३८ हजार ६१ झाली असून, मृत्यूदर २ पूर्णांक १२ शतांश टक्के झाला आहे. दरम्यान मुंबईत काल १७५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी दिली. मुंबईत आतापर्यंत ७ लाख ११ हजार ३२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल ४४१ नवीन रुग्णांची नोंद झाली. मुंबईत आतापर्यंत रुग्णांची संख्या ७ लाख ३४ हजार ३३७ झाली असून मुंबईतला रुग्ण दुपटीचा कालावधी १ हजार १९८ दिवसांवर आलाय.सध्या ४ हजार ५३७ रुग्ण उपचार घेत आहेत. काल कोरोनामुळे ५ रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांचा आकडा १६ हजार ११ वर पोचला आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.