राज्यात बरे झालेल्या रुग्णांपेक्षा नव्यानं आढळलेल्या रुग्णांची संख्या जास्त
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यात काल बरे झालेल्या रुग्णांपेक्षा नव्यानं आढळलेल्या रुग्णांची संख्या जास्त होती. काल राज्यभरात २ हजार ५०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले, ४ हजार १३० नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ६४ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण ६४ लाख ८२ हजार ११७ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ६२ लाख ८८ हजार ८५१ रुग्ण बरे झाले. तर, १ लाख ३७ हजार ७०७ हे रुग्ण दगावले. सध्या राज्यात ५२ हजार २५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक २ शतांश टक्के झालं आहे. तर, मृत्यूदर २ पूर्णांक १२ शतांश टक्के आहे. परभणी जिल्ह्यात काल एका रुग्णाची नोंद झाली. सध्या जिल्ह्यात २५ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. नांदेड जिल्ह्यात काल ५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल जिल्ह्यात ३ नवीन रुग्ण आढळले. सध्या जिल्ह्यात २३ रुग्ण उपचार घेत आहेत. वाशिम जिल्ह्यात काल बरा झालेल्या एका रुग्णाला घरी पाठवलं काल जिल्ह्यात पाच रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले सध्या १७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.