राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 152 वी जयंती आज साजरी करण्यात येत आहे. त्यानिमित्त देशात आणि परदेशातही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. नवी दिल्लीत राजघाट इथं गांधीजींच्या समाधीस्थळी सर्व धर्म प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी यानिमित्तानं संदेश दिले आहेत. गांधीजींनी अहिंसा हे तत्त्वज्ञान, तत्त्व आणि अऩुभव म्हणून मानलं आणि अहिंसेचा समाजाच्या उन्नतीसाठी उपयोग होऊ शकतो असं सांगितलं, असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. गांधीजींचं आयुष्य देशासाठी प्रकाशाचा किरण असून ते देशाच्या प्रगतीसाठी मार्ग दाखवत आहे, असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.