प्राथमिक शाळेतले वर्ग प्रत्यक्ष सुरू करायला कृती दलाची मंजुरी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या कोरोनाविषयक कृती दलानं प्राथमिक शाळेतले प्रत्यक्ष वर्ग सुरु करायला परवानगी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतर या शाळा सुरू होऊ शकतील. यासंदर्भात उद्याच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. सध्या राज्यात डेल्टा प्लस प्रकारचा कोरोना अस्तित्त्वात आहे. नवीन प्रकार आलेला नाही, असंही ते म्हणाले. संपूर्ण लशीकरण हाच सध्या कोरोनावर एकमात्र उपाय आहे. राज्यात आतापर्यंत 10 कोटी 84 लाख मात्रा देण्यात आल्या. आतापर्यंत 80 टक्के लाभार्थ्यांना लशीची पहिली मात्रा, तर 40 टक्के लाभार्थ्यांना लशीच्या दोन्ही मात्रा देण्यात आल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं. ज्या जिल्ह्यांमध्ये कमी लसीकरण झालं आहे, त्या जिल्ह्यात आशा, अंगणवाडी कर्मचारी, आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या अधिकाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन लसीकरणाचं लक्ष्य देण्यात आलं आहे, असंही ते म्हणाले.

Popular posts
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image