राज्यात नवे निर्बंध लादण्याचा निर्णय २ दिवसात घेणार असल्याची आरोग्यमंत्र्यांची माहिती

 

मुंबई (वृत्तसंस्था) : गेल्या दोन दिवसात महाराष्ट्रात कोविड १९ च्या रुग्णांमध्ये दुपटीनं वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्बंधाविषयी निर्णय घेऊ, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत झालेल्या वार्ताहर परिषदेत सांगितलं. राजधानी दिल्लीमध्येही रुग्ण संख्या वाढल्यामुळे तिथले निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही निर्बंध कडक करायचे का यासंदर्भात ही चर्चा असेल, असं ते म्हणाले. राज्यात ८७ टक्के लोकांनी लसीची पहिली मात्रा घेतली असून ५७ टक्के लोकांनी लसीची दुसरी मात्राही घेतली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. मुंबईतला पॉझिटीव्हीटी दर ४ टक्क्यावर आला असला, तरी नागरिकांनी नियमांचं काटेकोर पालन करावं, असं आवाहन टोपे यांनी केलं.

Popular posts
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image