राज्यात गुरूवारी १९८ ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात ओमायक्रॉनची बाधा झालेल्या १९८ रुग्णांची काल नोंद झाली. त्यातले ३० रुग्ण आंतरराष्ट्रीय प्रवासी आहेत. या रुग्णांमध्ये १९० मुंबईतले, ठाण्यातले ४ आणि सातारा, नांदेड, पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवडमधला प्रत्येकी एक रुग्ण आहे. मुंबईतल्या १९० रुग्णांपैकी १४१ जणांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही. यापैकी ९५ जणांना कुठलीही लक्षणं नाहीत, ७ जणांना मध्यम तर ३९ जणांना सौम्य लक्षणं आहेत. १९० पैकी ९३ जणांचं लसीकरण पूर्ण झालं आहे, तर ३ जणांनी लसीची एक मात्र घेतली आहे. यामुळं राज्यातल्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची एकूण संख्या ४५० झाली आहे. त्यापैकी १२५ रुग्णांना कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर घरी सोडण्यात आलंय. राज्यात काल कोरोनाच्या ५  हजार ३६८ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १  हजार १९३ रुग्ण बरे झाले. २२ कोरोना बाधितांच्या मृत्यूमुळं राज्याचा मृत्यूदर २ पूर्णांक १२ टक्के झाला आहे. सध्या राज्यात सुमारे १ लाख ३३ हजार ७४८  रुग्ण गृह विलगीकरणात आहेत, तर १ हजार ७८  व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत आणि १८ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत काल कोरोनाचे ३ हजार ६७१ रुग्ण आढळून आले, तर ३७१ रुग्ण बरे झाले. काल मुंबईत एकही रुग्णाचा कोरोनामुळं मृत्यू झाला नाही.

Popular posts
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image