कोविड विषाणूचा ओमायक्रॉन हा प्रकार डेल्टा प्रकारापेक्षा तिप्पट अधिक संसर्गजन्य आहे - केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड विषाणूचा ओमायक्रॉन हा प्रकार डेल्टा प्रकारापेक्षा तिप्पट अधिक संसर्गजन्य आहे, असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांनी वॉर रूम सुरु कराव्यात तसंच जिल्हा आणि स्थानिक पातळीवर तातडीनं दखल घ्यावी, अशा सूचना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी लिहिलेल्या पत्रात दिल्या आहेत.  देशाच्या काही भागात अजूनही डेल्टा प्रकार आढळून येत आहे. त्यामुळे दूरदर्शीपणा, माहितीचा उहापोह, चांगली निर्णयक्षमता तसंच शीघ्र आणि कठोर प्रतिबंध या बाबींची स्थानिक तसंच जिल्हा पातळीवर गरज आहे, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.   कोविड - १९ विषाणूच्या प्रसाराची ताजी आकडेवारी लक्षात घेऊन परिस्थितीचा सातत्यानं आढावा घ्यावा, रुग्णालय सुविधा, मनुष्यबळ, प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करणं अशा बाबींवर लक्ष ठेवावं, असंही यात म्हटलं आहे.

Popular posts
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image