माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरुद्ध आज सक्तवसुली संचालनालयानं विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. मनी लाँडरिंग प्रकरणी देशमुख यांना प्रमुख आरोपी करण्यात आलं असून त्यांच्या चिरंजीवांवरही आरोप लावण्यात आले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी प्रथम देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर गेल्या एप्रिलमधे सीबीआयने त्यांच्या चौकशीला सुरुवात केली होती. आता मनीलाँडरिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालय त्यांची चौकशी करत आहे. १ नोव्हेंबरला अनिल देशमुखांना अटक झाली असून त्यांना मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात ठेवलं आहे.

Popular posts
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image