पेट्रोल आणि डिझेल ला बायो-इथेनॉल सक्षम पर्याय - नितीन गडकरी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेट्रोलियम आणि इंधनाच्या आयातीचा खर्च १० हजार कोटीपेक्षा जास्त असून त्याला पर्याय म्हणून पर्यावरण सक्षम तसंच किफायतशीर बायो-इथेनॉलची गरज असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूरमध्ये बोलत होते. पेट्रोलवर चालणाऱ्या सर्व गाड्यांमध्ये यापुढे फ्लेक्स इंजिनची सुविधा राहणार असून त्यामुळे वाहनांची किंमत बदलणार नाही असं ते म्हणाले. शंभर टक्के बायो-इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्यांमुळे शेतकऱ्यांना इथेनॉलचे पंप सुरु करायची संधी मिळेल आणि त्यामुळे त्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडेल असं गडकरी म्हणाले.

Popular posts
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image