अमली पदार्थ नियंत्रण विषयक समन्वय केंद्राची तिसरी उच्चस्तरीय बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली पार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमली पदार्थ नियंत्रण विषयक समन्वय केंद्राची तिसरी उच्चस्तरीय बैठक काल नवी दिल्लीच्या विज्ञान भवनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. गृहसचिव अजय भल्ला, गुप्तचर संस्थेचे संचालक अरविंद कुमार, अंमली पदार्थविरोधी पथकाचे प्रमुख एस. एन. प्रधान, तटरक्षक दलाचे प्रमुख, मुख्य सचिव, राज्यांचे पोलीस महासंचालक, केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी आणि इतर उपस्थित होते. अंमली पदार्थांच्या समस्येबद्दल केंद्र सरकार अतिशय दक्ष असून हा राष्ट्रीय सुरक्षेसाठी मोठा धोका आहे, मात्र सर्वांच्या समन्वयाने याचा सामना करता येऊ शकतो असं प्रतिपादन शहा यांनी यावेळी केलं.

 

Popular posts
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image