नववर्ष स्वागताला सार्वजनिक स्थळी होणारी गर्दी रोखण्यासाठी मुंबईत नवे निर्बंध लागू

 

मुंबई (वृत्तसंस्था) : सरत्या वर्षाला निरोप देताना तसंच नववर्ष स्वागताला सार्वजनिक स्थळी होणारी गर्दी रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी नवे निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार संध्याकाळी ५ ते सकाळी ५ दरम्यान समुद्र किनारे, मैदानं, बगिचे आणि यासारख्या इतर सार्वजनिक ठिकाणानांना नागरिकांना भेटी देता येणार नाहीत. सर्व प्रकारचे लग्न समारंभ, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक आणि इतर कार्यक्रमांना ५० पेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही. अंत्यसंस्कारालाही जास्तीत जास्त २० जणांना उपस्थित राहता येईल. आज दुपारपासून १५ जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत हे निर्बंध मुंबईत लागू राहतील.

Popular posts
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image