राज्यात बुधवारी ओमायक्रॉनचा एकही नवा रुग्ण आढळला नसल्याची नोंद
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ओमायक्रॉन संसर्ग झालेला एकही नवा रुग्ण आढळला नाही. राज्यातल्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या दोन हजार ८५८ एवढी असून, यापैकी एक हजार ५३४ रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत. राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ३५ हजार ७५६ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७६ लाख पाच हजार १८१ झाली आहे. काल ७९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४२ हजार २३७ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे. काल ३९ हजार ८५७ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७१ लाख ६० हजार २९३ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९४ पूर्णांक १५ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या दोन लाख ९८ हजार ७३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.