भाजपा आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व अर्ज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला

 

मुंबई (वृत्तसंस्था) : भाजपा आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला. संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे यांनी येत्या दहा दिवसांत जिल्हा न्यायालयासमोर हजर व्हावं, असे निर्देश सरन्यायाधीश एन व्ही रामण्णा, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती ए एस बोपण्णा यांच्या पीठानं दिले आहेत. ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी आणि सिद्धार्थ लुथरा यांनी राणे यांची बाजू मांडली तर अॅडव्होकेट डॉक्टर अभिषेक मनू सिंघवी यांनी राज्य सरकारतर्फे युक्तिवाद केला.

Popular posts
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image