मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १ हजार ५४५ अंकांनी कोसळला
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या शेअर बाजारात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेली घसरण आजही सुरूच राहिली. सेन्सेक्स आज १ हजार ५४५ अंकांनी कोसळून ५७ हजार ४९२ अंकांवर बंद झाला तर निफ्टी ४६८ अंकांनी कोसळून १७ हजार १४९ अंकांवर बंद झाला.
सत्रादरम्यान सेन्सेक्स ५७ हजार, तर निफ्टी १७ हजारांच्या खाली गेला होता. मात्र अखेरच्या तासाभरात बाजार सावरला आणि घसरण थोडी कमी झाली. परदेशी संस्थात्मक गुंतवणुकदारांकडून सातत्यानं सुरू असलेल्या विक्रीमुळं बाजारात ही घसरण दिसून येते आहे. गेल्या आठवडाभरात सेन्सेक्स ३ हजार ८०० हून अधिक तर निफ्टी १ हजार १६० अंकांनी घसरला आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.