पालकांचे वार्षिक उत्पन्न ६ लाखांच्या आत असणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेशी विमान प्रवासाचे आगाऊ भाडे मिळणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येत असलेल्या राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेंतर्गत परदेशी विद्यापीठात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ६ लाखांच्या आत आहे, त्या विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यासाठी विमान प्रवासाचे भाडे आता आगाऊ देण्यात येणार आहे.सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिली. या संबंधीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेंतर्गत निवड झाल्यानंतर पूर्वी संबंधित विद्यार्थ्यांना स्वखर्चानं विमानाचं तिकीट काढावं लागत असे. विद्यापीठात प्रत्यक्ष हजर झाल्यानंतर त्यांनी विमानाचं तिकीट आणि बोर्डिंग पास जमा केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना विमानाचं भाडं दिलं जायचं. यामुळे ऐनवेळी तिकिटासाठी लागणारी रक्कम जुळवताना गरीब कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना अडचण यायची, त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं मुंडे यांनी सांगितलं.

Popular posts
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image