म्हाडाची भरती परीक्षा सोमवारपासून

 

मुंबई (वृत्तसंस्था) : म्हाडा अर्थात महाराष्ट्र गृहनिर्माणआणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या सरळ सेवा भरतीमध्ये तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गातील ५६५ पदे भरण्याकरिता येत्या ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे. सुलभ तांत्रिक सोयींच्या उपलब्धतेनुसारविविध जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्र निवडण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने प्रवेश पत्र डाउनलोड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती 'म्हाडा'चे सचिव राजकुमार सागर यांनी काल दिली. विद्यार्थ्यांनी कोणत्याही व्यक्तीच्या किंवा मध्यस्थांच्या भूलथापांना बळी पडू नये आणि कोणत्याही गैरमार्गांचा अवलंब करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं .

Popular posts
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image