गगनयान कार्यक्रमाअंतर्गत आगामी मानवरहित मोहिमांपैकी एक मोहिम पूर्ण करण्याचे इस्रोचे उद्दिष्ट
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गगनयान कार्यक्रमाअंतर्गत आगामी मानवरहित मोहिमांपैकी एक येत्या स्वातंत्र्यदिनापर्यंत पूर्ण करण्याचं भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचं उद्दिष्ट आहे. इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी सांगितलं की EOS-02, EOS-4 आणि EOS-6 या उपग्रहांचं उड्डाण गेल्यावर्षीपासून कोविड महामारीमुळे लांबणीवर पडले आहे. यंदा स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून ते पूर्ण करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले. चंद्रयान-3 चे उड्डाण पुढच्या वर्षी जूनच्या सुमारास होण्याची शक्यता आहे. देशाची सूर्यावरची मोहीम आदित्य एल वन देखील गेल्यावर्षी सुरु होणार होती ती लांबणीवर पडली आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.