प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपतींची ३८४ शौर्य पुरस्कारांना मंजुरी
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : त्र्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ३८४ शौर्य पुरस्कारांना मंजुरी दिली आहे. यात १२ शौर्य चक्र, २९ परम विशिष्ट सेवा पदकं, ४ उत्तम युद्ध सेवा पदकं, ५३ अतिविशिष्ट सेवा पदकं, १३ युद्ध सेवा पदकं, थ्री बार विशिष्ट सेवा पदकं, १२२ विशिष्ट सेवा पदकांचा समावेश आहे. याशिवाय ८१ सेना शौर्य पदकं, दोन वायुसेना शौर्य पदकं, कर्तव्यनिष्ठेसाठी ४० सेना पदकं ८ नौसेना पदकं आणि १४ वायु सेना पदकांना मंजुरी मिळाली आहे. बारा शौर्य चक्र विजेत्यांपैकी ९ जणांना मरणोत्तर पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. याशिवाय टोक्यो ऑलिंपिक स्पर्धेतल्या भालाफेक खेळातला सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याला प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला काल परम विशिष्ट सेवा पदकानं गौरवण्यात आलं.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.