डिजिटल युगात स्टार्टअप कंपन्या भारताला ज्ञानाधारित अर्थव्यवस्था म्हणून ओळख प्राप्त करून देण्यासाठी सक्षम - पियुष गोयल

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्याच्या डिजिटल युगात स्टार्टअप कंपन्या भारताला ज्ञानाधारित अर्थव्यवस्था म्हणून ओळख प्राप्त करून देण्यासाठी सक्षम आहेत, असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. सोळाव्या इंडिया डिजिटल संमेलनाचं उदघाटन, काल गोयल यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. डिजिटल युगात तंत्रज्ञानानं सीमा आणि इतर मर्यादांना मागे टाकलं असून देशातले उद्योग आता सीमांच्या बंधनातून मुक्त झाले आहेत, असं ते म्हणाले. स्टार्ट अप कंपन्यांनी ग्रामीण क्षेत्रातल्या सूक्ष्म उद्योगांना सहाय्य करावं, त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी तंत्रज्ञाचा वापर करावा, शेतकरी, विणकर आणि कारागिरांना त्यांच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी डिजिटल माध्यमांचा वापर करण्यासाठी प्रेरित करावं, असं आवाहन गोयल यांनी केलं. स्टार्ट अप इंडिया अभियानाला सहा वर्ष पूर्ण झाली असून या काळात स्टार्ट अप्स मुळे देशात ६ लाख नोकऱ्यांची निर्मिती झाली, असं त्यांनी सांगितलं. 

 

 

Popular posts
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image