मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर पाहिल्या ऑर्थोट्रॉपिक स्टील डेकची उभारणी
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर पाहिल्या ऑर्थोट्रॉपिक स्टील डेकची उभारणी करण्यात आली आहे. त्याची लांबी ११९ मीटर आणि वजन १ हजार ३३१ मेट्रिक टन इतके आहे. भाग एकमध्ये मुंबईतील शिवडी इंटरचेंजसह मुंबई खाडी ओलांडून सुमारे १० पूर्णांक ३८ किलोमीटर लांबीच्या पुलाचे बांधकाम समविष्ट आहे. दक्षिण मुंबईला नवी मुंबईशी जोडणाऱ्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पामुळे वेळेची बचत होणार आहे. आता १२० मिनिटं लागतात या प्रकल्पामुळे फक्त २० मिनिटं लागतील. प्रकल्पाची किंमत १७ हजार ८४३ कोटी रुपये असून त्याची ८० टक्के पुलाच्या खांबाची कामं पूर्ण झाली आहेत. प्रकल्प ६५ टक्के पूर्ण झाला असून तो डिसेंबर २०२३ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. प्रकल्पातील हा भाग म्हणजे सर्वात गुंतागुंतीचं काम आहे,' असं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त एस. व्ही.आर. श्रीनिवास यांनी सांगितलं.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.