ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक दिनकर रायकर यांचं आज पहाटे निधन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक दिनकर रायकर यांचं आज पहाटे निधन झालं. ते ७९ वर्षांचे होते. गेले काही दिवस आजारपणामुळे त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. दिनकर रायकर यांनी इंडियन एक्सप्रेसमधून आपल्या पत्रकारितेची सुरुवात केली होती. वार्ताहर ते सहसंपादक असा प्रवास त्यांनी एक्सप्रेसमध्ये केला. त्यानंतर त्यांनी लोकमतच्या मुंबई आवृत्तीचे संपादक आणि नंतर समुह संपादक म्हणून पदभार सांभाळला. ते विधीमंडळ वार्तहर संघ आणि मुंबई प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष होते. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Popular posts
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image