सांगलीतले शहीद जवान रोमित चव्हाण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : सांगलीतले शहीद जवान रोमित चव्हाण यांच्या पार्थीवावर आज शिगाव या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, माजी मंत्री सदाभाऊ खोत, यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक यावेळी उपस्थित होते. जम्मू काश्मीरमध्ये शोपियां जिल्ह्यात, झेनपूरा इथं आतंकवाद्यांचा शोध घेत असताना, झालेल्या चकमकीत रोमित चव्हाण शहीद झाले होते. त्यांचं पार्थिव आज सकाळी शिगाव या त्यांच्या मूळगावी आणलं होतं.